Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

करण चौफूली परिसरात आठ दिवसांत अपघातात दुसरा मृत्यू, नंदुरबार वर शोककळा

नंदुरबार दि २६ (प्रतिनिधी) नंदुरबार करण चौफूली परिसरात आठ दिवसांत अपघातात मृत्यूची दुसरी घटना आहे.विशाल चौधरी या फोटोग्राफी करणा-या युवकाचा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.ही घटना वा-यासारखी शहरभर पसरली, घटनास्थळी नातेवाईक व आप्तस्वकीय गोळा झाले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
               या रस्त्यावर वाळू वाहतूक सुरू असते.ट्रकचालक  बेदरकार पद्धतीने वाहन हाकतात डंपर व ट्रक चालक मोठ्या मोठ्या राजकीय नेते व अधिकारींचे हितसंबंधित असल्याने यांना आवर कोण घालेल अशी चर्चा सतत होते.या  गंभीर बाबीची आरटीओ बघ्याची भूमिका घेतात,या घटनेनंतर रेती रॅकेट मध्ये कोणा कोणाचे हात ओले होतात याची चर्चा सुरू आहे.