सातपुड्याचा बुलंद आवाज आदिवासी समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रातील नेतृत्व विधान परिषदेचे आमदार आमशा दादा पाडवी यांचा आज शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश झाला असून "दादा तुम्ही जिथे तिथे आम्ही!!! असे फलक कार्यकर्ते सोशल मीडियावर फिरवत आहेत.
अशा आशयाचे बॅनर सोशल मीडियावर फिरत असुन यासोबतच मुंबईत शेकडो गाड्या हजारो कार्यकर्ते गेल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.ते उबाठातुन शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश केल्याचे सोशल मीडियासह टि व्ही वर दिसत आहे.याबाबत आमदार आमशादादा पाडवींसोबत दहा महिला सरपंच, अठ्ठेचाळीस पुरुष सरपंच, जि प सदस्य व कुटुंबातील सदस्यांसह कार्यकर्ते उपस्थित आहेत.