रामनगर बोराडी ता शिरपूर येथील भाविक देव मोगरामातेच्या दर्शनासाठी देव मोगरा गुजरात येथे गेले असता दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात चार चाकी पिकपचे एक्सेल तुटल्यामुळे गाडी पलटी होऊन पुलाखाली जाऊन पडली यात दोन भाविक जागीच ठार, तर सतरा भाविक जखमी झाले आहेत.
यात दोन-तीन लोकांचे प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या अपघातात चंद्रसिंग रामदास पावरा (वय ३९) व दारासिंग बुधा पावरा (वय ५६) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बोराडी येथील रामनगर येथील रहिवासी दि.१५ मार्च रोजी बोराडीहून देव मोगरामातेच्या दर्शनासाठी गुजरातेतील आदिवासी बांधवांचे जागृत देवस्थान देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दि. १६ मार्च रोजी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास खापर ते उदेपूर गावाच्या दरम्यान अंकलेश्वर ब-हाणपुर महामार्गावर गाडीचा एक्सल तुटल्याने वाहन पुलाच्या खाली गेले.त्यात गाडीतील प्रवासी दाबले गेले व त्यातील दोन प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला व इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अक्कलकुवा, जिल्हा रुग्णालया नंदुरबार येथे दाखल करण्यात आलेले आहे.
यातील तीन भाविकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात चंद्रसिंग रामदास पावरा (वय (३९) व दारासिंग बुधा पावरा (वय ५६) यांचा जागीच ठार झाले. या अपघातात जखमींमध्ये हिरालाल आजऱ्या पावरा, सुनिल हुसन्या पावरा, दादू पावरा, गायत्री राजू पावरा, उषा पावरा, कालूसिंग जामसिंग पावरा, संजय बडे, बायनु पावरा, दिपक रणसिंग पावरा, रामबाई रामसिंग पावरा, देवा दला पावरा, भरत देवा पावरा, भारती राजू पावरा, बल्या लालसिंग पावरा, कुणाल मुकेश पावरा, रूपाली तुषार पावरा, आदी भाविकांचा समावेश आहे.
या अपघाताची माहिती मिळताच अक्कलकुवा येथील आमदार आमश्या पाडवी, व त्यांचे सहकाऱ्यांनी तातडीने मदत करून जखमींना प्राथमिक उपचारासाठी अम्बुलन्सने व खाजगी वाहनाने अक्कलकुवा व नंदुरबार येथे हलवण्यात मदत केली त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले. तसेच बोराडीहून अनेक मित्र मदतीसाठी धावून आले.सकाळपासून रामनगर परिसरातील सर्व व्यवहार बंद होते .संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अपघातातील दोघं मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.