Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना (उबाठा) जिल्हा पदाधिकारी याची बैठक आमदार आमश्या पाडवी यांच्या पक्षांतरावर मंथन

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि १८
          नंदुरबार येथे दि १७ रोजी शिवसेना (उबाठा) जिल्हा पदाधिकारी याची बैठक घेऊन आम्हीं सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला.
        अक्कलकुवा वगळता नंदुरबार जिल्ह्यातील एकही पदाधिकारी किंवा एक साधा कार्यकर्ता हा शिंदे गटात गेला नाही हे सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन दाखवून दिले. ज्यांना ज्यांना शिव सेनेने आज पर्यंत मोठं मोठी पद दिली त्यांनी शिवसेनेकडे पाठ केली. पण निष्ठावंत शिव सैनिक हा कधीच कोणत्या नेत्या मागे गेला नाही.

           नंदुरबार जिल्ह्यातील विधान परिषदचे आमदार आमश्या पाडवी यांना उद्धव ठाकरेंनी सर्वांचा विरोध असताना देखील आमदार केलं व आज त्यांनी देखील शिव सेनेकडे पाठ केली, त्यांचा या कृत्याचा सर्व निष्ठवंत पदाधिकारी यांनी जाहीर निषेध केला. आमदार आमशा पाडवी हे शिंदे गटात जाऊन सांगत आहेत की आम्ही कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम नाही करू शकत तर मग जेव्हा कॉग्रेस व राष्ट्रवादी च्या आमदारांची मत घेताना त्यांना योग्य कसे वाटले होते,असा प्रश्न प्रत्येक पदाधिकारी यांच्या तोडून निघत होता सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना श्री दिपक गवते यांनी सांगितले, आमाशा पाडवी यांनी उध्दव ठाकरे यांनी दिलेली.

                  आमदारकी चा राजीनामा द्यावा व परत निवडणूक लढुन निवडून यावे. महिला आघाडी प्रमुख सौ रिनाताई पाडवी यांनी सांगितले ,जे गेले त्याचा सोबत फक्त ठेकेदार लोक गेले बाकी कोणी नाही ज्यांना स्वार्थ आहे असेच लोक त्यांचा सोबत गेले बाकी सर्व कार्यकर्ते हे जिथे होते तिथेच आहेत. श्री अरुण चौधरी यांनी सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचा प्रत्येक निष्ठवंत शिव सैनिकांनी आता परत उद्धव साहेबाचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे लवकरच सम्पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी यांना घेऊन मातोश्री जाऊन आम्ही सदैव ठाकरे कुटूंबाचा सोबत आहोत हे दाखवून देऊ. त्यावेळी सर्व पदाधिकारी यांनी उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा देत सर्व परिसर दणकाऊन टाकले त्यावेळी सम्पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी हे उपस्थित होते.