तळोदा दि २३ ( प्रतिनिधी) तालुक्यातील आगग्रस्त उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आमदार राजेश दादा पाडवी यांनी मदतीचा हात देत माणुसकीचा परीचय देत ते सतत मतदार संघातील गोर गरीबांच्या संकटकाळात धावून जातात याचा परीचय दिला आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पाल्हाबार ता. तळोदा या गावी काही दिवसापूर्वी संदेश सेमट्या पाडवी यांच्या घराला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संदेश शेमट्या पाडवी यांच्या स्वतःच्या मालकीच्या गाय वासरूसह 28 शेळ्या, 49 कोंबड्या घरातील जीवनाशक वस्तू चांदीचे दागिने, अन्न धान्य व इतर वस्तू जळून खाक झाले. संपूर्ण घर देखील बेचिराग झाले.रस्तावर आले असता. या आदिवासी कुटुंबाला निवारा व कुटुंबाला कुटुंबनिर्भवनासाठी अन्नधान्य साठी आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांनी 50 हजार रोखीची तातडीची मदत केली. तसेच शासनाच्या वतीने पंचनामे करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत व शासनाची मदत मिळून देऊ असा विश्वास आमदार पाडवी साहेबांनी आगग्रस्त कुटुंबीयांना दिला.