पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कढेल ता तळोदा येथे जागेवरील वादातुन पाच जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,यांत जगदिश नामदेव चित्ते ,नामदेव काशिराम चित्ते, दयाराम सोमा चित्ते, सुभाष सोमा चित्ते, सोमा काशिराम चित्ते सर्व रा. कढेल ता. तळोदा जि नंदुरबार.
गुन्हयाचे कारण जागेच्या वादावरुन यातील आरोपीत मजकुर क्र. ०१ ते ०५ हे यांनी फिर्यादीचा मुलगा भटेसिंग यास सांगु लागले की, तुम्ही इथे साफ सफाई वगैरे करु नका असे सांगुन ते मुलगा भटेसिंग यांच्या अंगावर सगळे धाऊन आल्यानंतर त्याला धरुन ठेवले होते. त्यातील कोणीतरी त्याच्या पॅन्टच्या खिश्यात ठेवलेले ५०० रुपये दराच्या २० नोटा असे एकुण १०,०००/- रु. जबरीने काढुन घेतले व मी ते भांडण सोडवित असता माझ्या अंगावर जगदिश नामदेव चित्ते हा धावुन येऊन गळयातील २१ ग्रॅम सोन्याचे फतक त्याला मंगळसुत्राचा आकार असलेले मंगळसुत्र हे त्याने जबरीने तोडुन घेऊन मला त्याने जोरात धक्का मारल्याने मी उजव्या हातावर खाली पडुन मला दुखापत केली असे तक्रारीत म्हटले आहे.भादंवि कलम ३९५, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि राजेंद्र जगताप तपास करीत आहेत.