Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खा.डॉ.हिना गावित यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून केलेला विकास मतदारांपुढे मांडणार; नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत निर्धार

खा.डॉ.हिना गावित यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून केलेला विकास मतदारांपुढे मांडणार; नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत निर्धार

नंदुरबार  दि २३ (प्रतिनिधी) खा.डॉ.हिना गावित यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत केलेला विकास मतदारांपुढे मांडणार आणि महायुती मधील घटक पक्षांच्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना त्यासाठी कार्यरत केले जाईल; असा निर्धार नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत उपस्थित नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 
               नंदुरबार येथील बाबा रिसॉर्ट च्या सभागृहात दि. 22 मार्च 2024 रोजी लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार खा डॉ हिना गावित यांच्या निवडणूक प्रचार संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीची बैठक झाली.

                             बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित ,भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, खा डॉ हिनाताई गावित, भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावित, शिरपूर येथील भाजपाचे आ काशीराम पावरा, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे आ आमश्या पाडवी, भाजपचे नंदुरबार लोकसभा प्रमुख तुषार रंधे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, किरसिंग वसावे, आरपीआय जिल्हाध्यक्ष किरण कुवर, शामअण्णा वाघ, सुभाष पान पाटील, आदी मान्यवर व महायुतीचे विधानसभा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. 

                  आ. काशीराम पावरा आ. आमशा पाडवी यांच्यासह उपस्थित काही प्रमुखांनी आपापल्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडली आणि गावागावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचाराला वेग देण्याविषयी मत मांडले. महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान खा डॉ. हिना गावित यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून किती प्रकारच्या योजना आणि निधी प्राप्त झाले त्यावर आधारित झालेले विकास कार्य लोकांसमोर मांडले जावे आणि विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.