सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्ती प्रकरणी नोटीस बजावण्याचे उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश
March 24, 2024
नंदूरबार दि २४ (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण - औरंगाबाद सहाय्यक सरकारी अभियोक्ता नियुक्ती प्रकरणी नोटीस बजावण्याचे महत्त्वपूर्ण आदेश , अर्जदार एडवोकेट इमरान खान अहमद खान पिंजारी, राहणार तळोदा, यांनी मा. सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, मा. उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, व मा. सहसचिव, धोरण व संशोधन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, यांच्या विरुद्ध सहाय्यक सरकारी अभियोक्ता, वर्ग - अ, पात्र यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद, येथे अर्ज एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत दाखल केले आहेत. थोडक्यात माहिती अशी कि, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट - अ, संवर्गातील पद भरती करिता विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्जदार यांना मुलाखत पत्र पाठविण्यात आले होते. गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्जदार यांचे नाव गुणवत्ता यादीमध्ये असूनही पात्र यादीमध्ये नाव प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. अर्जदार यांनी संबंधित प्रसिद्धीपत्रकचा संदर्भ दिला होता. अर्जदार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. परंतू, कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नव्हता. माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (माननीय उपाध्यक्ष - माननीय न्यायमूर्ती श्री. पी. आर. बोरा व माननीय न्यायमूर्ती श्री. विनय करगावकर) यांनी आदेशान्वये प्रतिवादी यांना नोटीस बजावण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. अर्जदार तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.