नवागांव (बुडकी) येथे राव्वी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला...
जितेंद्र पावरा - युवा कार्यकर्ता नवागांव
शिरपुर दि २४ (प्रतिनिधी) तालुक्यातील बोराडी पासुन काही अंतरावर असलेल्या नवागांव (बुडकी) येथील मानाची व राव्वी होळी पाहण्यासाठी हजारो नागरीकांना हजेरी लावली तसचे रात्र भर पारंपारिक पद्धतीने आदिवासी नुत्य करुन आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले अशी माहिती जितेंद्र पावरा यांनी दिले.
शिरपुर तालुक्यात असलेल्या नवागांव (बुडकी) होळीला मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर असल्याने विशेष महत्त्व आहे, प्राचिन काळांपासुन सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपारिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्याच्या डोंगर रागांमधील नवागावची होळीत रात्रभर ढोलाच्या तालावर आदिवासी पारंपारीक नृत्य करण्यात आले.विशेष म्हणजे जवळपास शंभर चा वरती ढोलांनी होळीत उपस्थितीत दिली.
आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक पद्धतीने ढोल,बासरी,घुंगुरु व सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहरावाने होळीचा आंनद घेत स्थानिक वाद्यांच्या तालावर पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करत आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटविण्यात आली. होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूम धडाक्यात साजरी करण्यात आली होळी पाहण्यासाठी जिल्हातुनच नव्हे तर इतर जिल्हे, परराज्यातील हजारो नागरीक उपस्थित होते.
रात्रभर पारंपरिक आदिवासी नुत्य करण्यात आले नवागांव गावातील रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती तसचे समृहनुत्य, काली, बाबा, बुध्या, यांनी आदिवासी नुत्य चा आंनद घेतला तर होळी सणाची पंरपरा व माहिती डॉ.शाम पावरा (बोराडी) यांनी नागरिकांना दिली....
यावेळी :- आमदार काशीराम पावरा, राहुल रंधे (उपसरपंच बोराडी), जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता नवागांव),लक्ष्मण पावरा (पो.पाटील नवागांव), विश्वास पावरा (सरपंच),खंडु पावरा (वनकर्मचारी शहादा),कुष्णा पाटिल (PSI),अनिल पावरा, किसन पावरा, जयदास पावरा,महसुल, लेखक, साहित्य, वकिल, चित्रकला, पत्रकार विभाग, व मोठय़ा संख्येने नागरिक व ढोल वाजंत्री उपस्थित होते.....