Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वारस दाखला कट कारस्थान रचुन खोटे शपथ पत्रसादर करुन संगणमताने शासनाची व फिर्यादीची फसवणुक तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

तळोदा दि २४ (प्रतिनिधी) वारस दाखला मिळणे बाबत कट कारस्थान रचुन खोटे शपथ पत्र अर्ज सादर करुन संगणमताने शासनाची व फिर्यादीची फसवणुक केल्याची तक्रार शितल निलेश पावरा वय- २७ रा. भोगवाडे हल्ली मु. विहान पेट्रोलपंप समोर मोलगी रोड रोषमाळ बुद्रुक ता. अक्राणी जि. नंदुरबार यांनी दिल्यावरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            या प्रकरणी आरोपीस पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,माणिक जिरुबाई पावरा वय ५७ धंदा घरकाम, नागेश माणिक पावरा वय- २४ धंदा शिक्षण, महेश माणिक पावरा वय २२ धंदा शिक्षण सर्व रा. भोगवाडे ता अक्राणी जि नंदुरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 आरोपीत यांनी मा. तळोदा न्यायालयात दि. बॉम्बे रेग्युलेशन अन्वये वारस दाखला मिळणे बाबत कट कारस्थान रचुन खोटे शपथ पत्र अर्ज सादर करुन संगणमताने शासनाची व फिर्यादीची फसवणुक केली या कारणावरुन मा. तळोदा न्यायालयातुन सी. आर. पी. सी. १५६ (३), प्रमाणे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
        यातील आरोपीत मजकुर यांनी आरोपीत क्र. ०१ ते ०३ यांनी संगनमत करुन मा. तळोदा न्यायालयात वारस दाखला मिळणे बाबत खोटे दस्ताऐवज, खोटे अर्ज दाखल केले ते स्वतः वारस नसतांना आरोपीत यांनी वारस असल्याचे खोटे शपथपत्र मा. न्यायालय तळोदा येथे दाखल केले फिर्यादी यांना आर्थिक लाभ मिळणारे हे मिळु नये व फिर्यादी व शासनाची फसवणुक केली वगैरे मजकुर म्हणुन गुन्हा केला आहे.गुन्हा घडल्याचे ठिकाण मा. तळोदा न्यायालय सो. परिसरात ता. तळोदा जि. नंदुरबार दि. २३/०३/२०२४ रोजी १७/२० वा.रोजी भादंवि कलम १२०- ब, १९१, १९२, १९३, ४०६, ४१९, ४२०, ५११.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि राजेंद्र जगताप पोउनि / महेश निकम करीत आहेत.