सरदार सरोवर विस्थापितांची वसाहत जीवन नगर ता.शहादा येथे नर्मदा बचाओ आंदोलनाकडून होळी चे आयोजन करण्यात आले होते.मुळगावातून वसाहतीत स्थलांतरित झाल्यानंतर ही 13 वी होळी साजरी करण्यात आली. होळी साठी मेधाताई पाटकरांसह मालेगाव येथून जेष्ट सर्वोदयी,नर्मदा बचाओ आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेले डॉ.सुगन बरंठ, संजय जोशी नर्मदा नवनिर्माण अभियानाचे विश्वस्त मालेगाव,व त्यांच्यासोबत 20 सहकारी सहभागी झाले.माजी dysp शहादा श्री सपकाळे कानडदा जिल्हा जळगावचे बिनविरोध सरपंच,अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गो.पी लांडगे,प्रा.प्रदीप पाटील,
प्रा.डॉ.उप प्राचार्य,के.एन. सोनवणे चोपडा, बेबी वाईकर परभणी,हरेसिंग भाई,बगुद म.प्र. कृषी उत्पन्न बाजार समितीचे, अभिजित पाटील,सुहास नाईक जिल्हा परिषद उपाध्यक्ष, प्रा भीमसिंग वळवी,सुहास नाईक, मोहन शेवाळे,जि प सदस्य , अनिल कुंवर फुले आंबेडकर स्टडी सर्कल शहादा, श्री मोरे पोलीस निरीक्षक, म्हसावद, रामभाऊ चौधरी,रामसिंग गिरासे, निमा पटले प स सदस्य शहादा, जिलेबी वसावे सरपंच जीवन नगर,संदीप पाटील कलमाडी व परिसरातील राजकिय सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत शहीद भगतसिंग व राममनोहर लोहिया यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फुलहार अर्पण करण्यात आला. व सभेला सुरुवात झाली ,जीवन शाळेची माजी विद्यार्थिनी एलिसा पावरा हिने संविधान गीत सादर केले.मेधाताई पाटकर यांनी संविधान बचाओ, जनतंत्र बचाओ,देश बचाओ वर प्रस्तावना केली. जल, जंगल, जमिनीवर स्थानिकांचाच अधिकार असला पाहिजे,ग्रामसभेत वेगवेगळे ठराव करून शासनाला त्यावर अंमल करायला लावला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे भाव दिला पाहिजे,नागाईदेवी साखर कारखान्याने उर्वरीत शेतकऱ्यांचे पेमेंट थकवून शेतकऱ्यांची दिशाभुल केली आहे.लदाख येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यात आले. व शेवटी गो पी लांडगे यांनी जमलेल्या समुदायाला संविधानाची प्रास्ताविका सामदायिक पणे वाचन करीत सभेचा समारोप झाला.
रात्रभर ढोल च्या तालावर शेकडो पावले थिरकली. बावा-बुध्या,गेर यांनी सर्वांची लक्ष वेधून घेतले. सकाळी 6 वाजता होळी पेटविण्यात आली.व त्यानंतर ढोल व बावा- बुध्या, गेर यांना गावकऱ्यांकडून बक्षीस वितरण करण्यात आले. परिसरातून जवळपास 57 ढोलांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन चेतन साळवे यांनी केले.ओरसिंग पटले यांनी प्रस्तावना केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरसिंग जेरमा वसावे,कांतीलाल पावरा,कृष्णा पावरा, गोरजी पावरा,कुरशा पाडवी ,लतिका राजपूत, खेमसिंग पावरा यांनी परिश्रम घेतले.