तळोदा दि २५ (प्रतिनिधी) विक्रम नगर तळोदे येथिल आरक्षित जागेवर कुंपण व सुशोभिकरण करणे बाबतचा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पालिका यांना रहीवाश्यांनी दिला आहे.
निवेदनाचा आशय असा,महोदय, आम्ही विनंती पुर्वक अर्ज करतो की, विक्रमनगर मधिल आरक्षित जागेवर घाणीचे मोठे साम्राज्य झाले आहे. मोठमोठी काटेरी झुडपे वाढलेली आहेत. गटारीचे घाण पानी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे आधी मच्छर, डास, डुकरे, कुत्रे इ. प्राण्याचे प्रमाण वाढलेले आहे. सफाई कामगारही या वसाहती मध्ये कचरा जमा व उचलण्यास येत नाहीत. कुञ्यांचे व डुकराचे प्रमाणही खूप वाढलेले आहे. आरक्षित जागेवरील घाण दूर करून तेथे बगीचा करण्यात यावे. व लहान मुलांसाठी खेळण्याचे साहीत्य उपलब्ध करून देण्यात यावे-जेणे करून लहान मुलांचे शारिरीक विकासासाठी मदत होइल. या वसाहती मधील गटारी बंदीस्त करण्यात याव्यात. रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. ते सुरू करण्यात यावेत. रस्त्यावर गतीरोधक बसविण्यात यावेत. आशा अनेक मागण्या आहेत. तरी वरील तक्रारीची दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी. व विक्रम नगर मधिल जनतेला त्याच दयावा ही नम्र विनंती होय. तसेच विक्रम नगर येथे पाण्याची सुविधा ही उपलब्ध करून द्यावी असे निवेदनात नमूद केले असून निवेदनावर मंसुरी एस एम,गिरणारे मनोज, सैय्यद इसाक, प्रा. रामचंद्र शंकरसिंग परदेशी ,मुकेश सिताराम जावरे, पुजा प्रेम मराठे, सुनिता प्रेम मराठे,अलताफ शे गफ्फार, मोहसीन शेख,हमीद मनियार , माजिद हमीद हमीद, मनियार, फारुक मन्यार, जुनेद मेहमुद, शाकीर सत्तार मन्यार, फिरोज मुनाफ, नासिर पिरखॉ, अब्बास पिंजारी,अल्ताफ इस्माईल पिंजारी, मोहसिन शेख लियाकत मोहसिन आदींच्या सह्या आहेत.