तळोदा दि ४ (प्रतिनिधी) शहादा तळोदा मतदारसंघातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी व गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन तळोदा शहादा मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांनी बोरद येथे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सांगितले.
बोरद येथे 3 मार्च 2024 रोजी बाजारपट्ट्यातील गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन, बोरद गावाबाहेरील कलमाडी रस्ता ते करडे बायपास रस्त्याचे भूमिपूजन, तसेच बाजारपट्ट्यातील शिवसेना बोर्ड पासून ते न्यूबन रस्त्यावरील पुल्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच लाखापुर फॉरेस्ट रस्त्यावरील पूला जवळील संरक्षण भिंत, शहादा रस्त्यावरील हद्दीपासून ते तळोदा चौफुलीपर्यंत काँक्रिटीकरण व डांबरीकरण रस्त्याचे तसेच लाखापूर फॉरेस्ट रस्त्यावरील काँक्रीटीकरण, गावांतर्गत रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजेश पाडवी म्हणाले की, ग्रामीण भागात रस्त्यासाठी तसेच गटारी, पुलासाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी यावेळी ठासून सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाला तळोदा प.स. उपसभापती विजय राणा, तळोदा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश वळवी, तळोदा शहादा मतदार संघाचे निवडणूक प्रभारी नारायण ठाकरे, बोरद गटाच्या जि. प. सदस्य सुनिता पवार, भरत पवार, मालदाचे सरपंच करुणा पावरा, गोपी पावरा. परिसरातील सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच तसेच बोरदच्या सरपंच अनिता भिलाव, युवा कार्यकर्ते रवींद्र भिलाव, उपसरपंच नीलिमा जाधव, विठ्ठल ढोडरे, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, प्रवीण राजपूत, राजेंद्र राजपूत, शानुबाई वळवी, कैलास चौधरी, दरबार पाडवी, बळीराम पाडवी, विलास डांबरे, प्रवीण ठाकरे, इत्यादी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रथम शहादा तळोदा चौफुली पासून संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली व जागोजागी भूमिपूजन लोकार्पण करण्यात आले. बोरद ग्रामपंचायतीमार्फत आमदार राजेश पाडवी यांचा सत्कार करून आमदार राजेश पाडवी यांना ग्रामपंचायत बोरद तर्फे त्यांच्या आई कलावती पाडवी यांची प्रतिमा देण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित, उपसभापती विजय राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक मुकेश कापुरे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.