सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ४
दै. एकमतचे प्रतिनिधी राहुल गजेंद्रगडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेड तर्फे पोलिस अधिक्षक, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांना देण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय असा,
दै. एकमतचे प्रतिनिधी राहुल गजेंद्रगडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. दै. एकमतचे प्रतिनिधी राहुल गजेंद्रगडकर हे नेहमीप्रमाणे दि. ३ मार्च २०२४ रोजी वार्तांकनांसाठी फिल्डवर गेले होते. दुपारी ३:३० ते ४ च्या दरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाला घोषीत झाला. जुने भुविकास बँक आयटीआय परिसर येथे निकालानंतर दोन गटात हाणामारी सुरु होती ही बाब लक्षात आल्यानंतर राहुल गजेंद्रगडकर यांनी घटनेचे छायाचित्र काढल्यानंतर ते एकमत कार्यालयाकडे येत असतांना त्यांना रस्त्यात अडवून अज्ञात तीघा जणांनी धक्काबुकी करत मारहाण केली तेथील उपस्थित नागरीकांनी एकमतचे प्रतिधिनी गजेंद्रगडकर यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर राहुल गजेंद्रगडकर आपल्या कार्यालयाजवळ आले असता पुन्हा दोघांजणांनी त्यांना अडवले त्यांचा फोटो काढून जिवे मारण्याची धमकी दिली.
आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती की, दै. एकमतचे प्रतिनिधी राहुल गजेंद्रगडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी,कार्याध्यक्ष
संतोष पांडागळे,सरचिटणीस राम तरटे ,रविंद्र संगनवार समन्वयक पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती नांदेड यांच्या सह्या आहेत.