तळोदा दि ४ (प्रतिनिधी) महाकाली बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिरीषकुमार नथ्थु माळी(बब्बू नाना) रा.तळोदा जि नंदुरबार यांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष निलेश माळी दिले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री मा.श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या मान्यतेने आपली नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करीत आहोत.असे पत्र प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी दिले आहे.प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी व पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रात नमूद केले आहे की,मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातील बलशाली भारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असाल यासह भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरण सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण पोचविण्याकरीता व संघटन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असाल यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.