तालुका स्तरीय कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राजेश दादा पाडवी शहादा- तळोदा विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अजय परदेशी,माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी,
तसेच बळीराम पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक संजय माळी, कैलास चौधरी, योगेश मराठे, कृउबा उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप परदेशी, योगेश चौधरी, माजी नगरसेवक रामा ठाकरे, राजू पाडवी, सातिवान पाडवी, नारायण ठाकरे, मा. सुभाष चौधरी, जगदीश परदेशी, नितीन पाडवी व पत्रकार तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते.
मोहिमेचे उदघाटन देवमोगरा मातेचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले.आमदार राजेशदादा पाडवी यांनी पोलिओ मोहीम बाबत मार्गदर्शन केले व नागरिकांना पोलिओ डोस ०-५ वयोगटातील बालकांना पाजून घेण्यासाठी आवाहन केले.
आरोग्य विभागातील विविध कार्यक्रम तळोदा तालुक्यात चांगल्या पद्धतीने सुरु आहेत. आरोग्य विषयक सर्व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचत असून लसीकरण,संस्थात्मक प्रसूती १००% होत असल्याने माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी तळोदा तालुक्याचे मोठे योगदान असल्याने तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे कौतुक केले.पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम बाबत उपस्थितांना माहिती दिली.
पल्स पोलिओ मोहीम दि.०३/०३/२०२४ रोजी सकाळी ०८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सुरू राहील व पुढील चार दिवस घरो घरी जाऊन एकूण १२० पथक द्वारे शहरी व ग्रामीण भागातील एकूण १९४७२ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार असल्याचे सांगितले.मोहीम साठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद,सोमवाल,
वाल्हेरी,मोदलपाडा,प्रतापूपुर तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व अधिकारी कर्मचारी मेहनत घेत आहेत.
ग्रामीण भागात पथक मध्ये (वैद्यकीय अधिकारी/सामुदायिक आरोग्य अधिकारी/मानसेवी वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य सहायक/सहायिका,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविका काम करीत आहेत.
डॉ. विशाल चौधरी, डॉ. प्रफुल गायकवाड, डॉ. हरीश कोकणी व डॉ. गोविंद शेल्टे तसेच आरोग्य कर्मचारी श्री. दिलीप पाटील, देवेंद्र राठोड, गौतम वळवी, हितेश गांगुर्डे, गजेंद्र परदेशी, रेखा गावित, कु. दामिनी सूर्यवंशी घनश्याम सूर्यवंशी इ. उपस्थित होते.