Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबारात

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ४
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबार येथे पोहोचणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी यात्रेच्या तयारीत व्यस्त आहे. सोमवार रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली.यावेळी राहुल गांधी यांच्या नियोजित न्याय यात्रा व सभेचे नियोजन तयारी संदर्भात जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय करण्यात आला. यात्रेत व्यापारी व शहरवासीयांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
               नंदुरबार येथे येत्या १२ मार्च रोजी राहुल गांधींच्या न्याय यात्रा व सभेच्या जागेची पाहणी करतांना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात ,माजी मंत्री आ.ॲड.के.सी.पाडवी ,आमदार शिरीषकुमार नाईक , पक्षाचे जिल्ह्याचे प्रभारी मा. पानगव्हाणे .माजी खासदार बापूसाहेब चौरे,रणजित पावरा,कार्याध्यक्ष सुभाषआण्णा पाटील,प्रतीभाताई शिंदे,जि प उपसभापती सुहास नाईक,श्री.गोवाल पाडवी,राजेंद्र पाटील.योगेश चौधरी.यु.कॉ.अध्यक्ष निलेश पाटील उपस्थित होते.यावेळी राहुल गांधींच्या नियोजित न्याय यात्रा व सभेच्या नियोजन व तयारी संदर्भात जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली.