Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार आमशादादा पाडवी यांनी प्रसुतीसाठी दवाखान्यात नेतांना मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली

आमदार आमशादादा पाडवी यांनी प्रसुतीसाठी दवाखान्यात नेतांना मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली 
अक्कलकुवा दि ५(प्रतिनिधी)
 अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी बर्डी येथील गर्भवती माता कविता मगन राऊत (वय १९) गेल्या असता त्यांना त्रास होत असल्याने पिंपळखुटा येथून मोलगी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. मात्र, पिंपळखुटा ते मोलगीदरम्यान सुरगस जवळ संबंधित रुग्णवाहिका बंद पडल्याने तब्बल तासभर सुरु न झाल्याने मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.

              तेथेच सदर महीलेने मुलाला जन्म दिला. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन जाणे गरजेचे होते. संबंधित रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे दुसरी रुग्णवाहिका मोलगी येथून मागविण्यात आली व पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन गेले असता नंदुरबार येथे पोहचे पर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. 
      जर रुग्णवाहिका बंद पडली नसती तर महीलेचा जीव वाचू शकला असता. संबंधित कामचुकार कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई साठी विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता.ते अधिवेशनातुन मतदार संघात परतले असुन मृत महिलेच्या गावी घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले.प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा व ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे भेट देऊन आरोग्य विषयक सुविधांची माहिती घेतली.