Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेश पाडवी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शहादा व तळोदा येथील विकास कामांसाठी दहा कोटी रुपये मंजूर.

आमदार राजेश पाडवी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून  शहादा व तळोदा येथील विकास कामांसाठी दहा कोटी रुपये मंजूर.

शहादा दि ५ (प्रतिनिधी ) राज्य शासनाने नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजतेअंतर्ग शहादा नगरपालिके करिता ५ कोटी ४० लाख तसेच  तळोदा नगरपरिषद,  करिता ४ कोटी ६० लाख रुपये असा एकूण  दहा कोटी  रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच या निधीतून विविध समाजांचे सभा मंडप समाज भवन व इतर विकास कामे केली जाणार आहे अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली.
               राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले या अर्थसंकल्पा दरम्यान शहादा विधानसभा मतदारसंघातील शहादा व तळोदा या दोन्ही नगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्याकडे केली होती या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही नगरपालिकांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 
              या निधीतून शहादा  नगर पालिका हद्दीतील रामनगर येथील श्रीराम मंदिराचा सभामंडप बांधकाम करणे, मलोणी येथे श्रीराम चौक येथे सभामंडप बांधकाम करणे , गुरव समाज भवन बांधकाम करणे, चर्मकार समाज भवन बांधकाम करणे, सिद्धी विनायक मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे गोविंद नगर येथे IDBI बैंक समोर खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे , भावसार समाज मंगल कार्यालय येथे सभामंडप बांधकाम करणे या कामांसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये , जांगीड समाज भवन बांधकाम करणे. , भोई समाज भवन येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे ,  प्रभाग क्रमांक १२ मधील  जितु भोई यांच्या घरापासून ते  अनिल मोरे यांच्या घरा पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे ,  प्रभाग क्रमांक १० मधील श्री. हेमंत मराठे यांच्या घरापासून ते भामरे स्कुल पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ,  प्रभाग क्रमांक ८ मधील  दिपक सोनवणे यांच्या घरापासून ते  वेडू नकसरे यांच्या घरा पर्यंत गटार तयार करणे , प्रभाग क्रमांक १३ मधील श्रीकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते तयार करणे या विकास कामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये , प्रभाग क्रमांक ०६ मधील  ए. के. पाटील यांच्या घरापासून ते  पी. वी. पाटील यांच्या घरा पर्यत रस्ता डांबरीकरण करणे ६०.०० लाख रुपये तसेच प्रभाग क्र १३ मधील सर्व्हे नंबर ८५/१,८५/२ व ८५/३ तसेच ८४+९०+९३/१अ व ८४ +९०+९३/१व दीनदयाळ नगर अंतर्गत रस्ते डांबरीकण करणे एक कोटी 50 लाख रुपये असा एकूण पाच कोटी चाळीस लाख रुपये तसेच तळोदा नगरपरिषद हद्दीतील निम हट्टी येथील शेठ के. डी हायस्कूल समोर लादीकरण करणे.४० लाख रुपये ,  प्रधान हट्टी येथे सभामंडप बांधकाम करणे , कलाल समाज भवन येथे वॉल कंपाउंड बांधकाम करणे , शिंपी समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, भोई समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे , मराठा समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे,  कुंभार समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, तांबोळी समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे , गुरव समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे.सुतार समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे.जोहरी समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे., मेहतर समाज सभागृह / सभामंडप बांधकाम करणे प्रत्येकी 30 लाख रुपये प्रधान हट्टी येथे बंद गटार बांधकाम करणे,  २० लाख रुपये माळी समाज मंगल कार्यालय येथे सभामंडप बांधकाम करणे ७० लाख रुपये असा एकूण चार कोटी साठ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. 
              राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीतून दोन्ही नगरपालिका अंतर्गत लवकरच निविदा प्रक्रिया व इतर तांत्रिक बाबी पार पाडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी दिली.