सातपुडा पर्वत रांगेत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात नव्वद टक्के आदिवासी समाज वास्तव्यास आहेत.दहा टक्के लोक नोकरी व्यवसाय निमित्त वास्तव्य करतात, मुख्य रस्ते सोडले तर पाडे आणि वाड्यांपर्यत पायी जावे लागते.पिण्याचे शूद्ध पाणी,शाळा, आरोग्य, सर्वत्र दयनीय अवस्था आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खूर्द येथील रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत आहे, रुग्णांना उपचारासाठी शहरात घेऊन जातांना तीचा रस्त्यात दम तुटतो अधिकारी कर्मचारी यांचीही दमछाक होते.सदर अंबुलन्स वेळीच बदलली नाही तर पिंपळखुंटा सारखी घटना अजुन सातपुड्यातच घडू शकते, धडगाव तालुक्यात नर्मदा किनारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खुर्द परीसरात गरजवंताला सेवा देते मात्र जुनी रुग्णवाहिका आहेत बऱ्याच वेळी हि रुग्णवाहिका रस्त्यात बंद सुद्धा पडली आहे, व आता सध्यस्थितीत तर ती रुग्णवाहिका बंदच आहे, जर कोणी रुग्ण असेल तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी खिशाला तोशीस देऊन तत्काळ खाजगी वाहन उपलब्ध करून देतो, जर खाजगी वाहने नाही भेटली तर पिंपळखुटा सारख्या घटनेची पुनरावृत्ती होईल, वारंवार पाठपुरावा व मागणी करून सुध्दा रुग्णवाहिका शासन देत नाही.असे स्थानिकांचे म्हणणे आहे,तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच दखल घेतली तर रुग्णांचा जीव वाचेल!!!