अक्कलकुवा तालुक्यातील काकरपाडा येथील गोपाल हरचंद तडवी यांची नुकतीच शिवसेना प्रणित शेतकरी सेना तालुकाप्रमुख पदी एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. ही नियुक्ती शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख वकील माणिक पाटील यांनी केली आहे.
शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख नंदुरबार व धूळे लोकसभा मतदारसंघ तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किरेसिंग वसावे,दरबारसिंग पाडवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.