Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

01-नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाच्या भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम घोषित

नंदुरबार दि १८ (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024. नमुना -1 मधील निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत प्रसिद्धीला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिले आहे.
संदर्भ:- प्रेस नोट क्रमांक ECI/PN/23/2024, दिनांक 16 मार्च 2024 रोजी भारत निवडणूक आयोगाकडून.
           उपरोक्त विषयान्वये कळविणेत येते की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कामी 01-नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
          या निवडणूकीची विहीत नमुना 1 मधील अधिसूचना (NOTICE OF ELECTION, FORM-1) यासोबत मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रत्येकी एका प्रतीत पाठवित आहोत. सदर अधिसूचना तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गांव पातळीवरील शासकीय कार्यालय, न्यायालय, नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय इ. कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच आपल्या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. 18/04/2024 रोजी प्रसिध्द करणेत यावी. प्रसिध्दीनंतर तसा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करणेत यावा असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (सर्व),तहसिलदार,गट विकास अधिकारी, पं.स.सर्व, मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत सर्व नंदुरबार,
अक्कलकुवा/अक्राणी/तळोदा/शिरपूर/साक्री, नवापूर,शहादा,

            निवडणुकीची सूचना
                 याव्दारे सूचना देण्यात येते की,
१) ०१- नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातून एका सदस्याची लोकसभेसाठी निवडणूक घ्यावयाची आहे;
२) नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, ०१- नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ किंवा विनायक महामुनी, सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक २५ एप्रिल २०२४ (गुरुवार) पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ०१- नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे दाखल करता येतील.
३) नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील;
४) नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २६ एप्रिल २०२४ (शुक्रवार) रोजी सकाळी ११.०० वाजता रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे करण्यात येईल;
५) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा (उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या) त्याच्या निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २९ एप्रिल २०२४ (सोमवार) रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत देता येईल .
६) निवडणूक लढविली गेल्यास दिनांक १३ मे, २०२४ (सोमवार) रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.असे जाहीर करण्यात आले आहे.

दिनांक : १८ एप्रिल, २०२४ (गुरुवार)

        मनीषा खत्री
निवडणूक निर्णय अधिकारी ०१-नंदुरबार (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ