09 लाख 08 हजार 616 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..!!
नंदुरबार दि १७ (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील अवैध धंदयांवर सततची कारवाई सुरू असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी त्यांचे स्टाफला दिलेल्या सुचनांनूसार दिनांक 17/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि-श्री. दिनेश भदाणे, पोउपनि- श्री. मुकेश पवार व स्टाफ असे नंदुरबार शहरातील करण चौफूली जवळ सकाळी 06.30 वाजेचे सुमारास पेट्रोलिंग करुन संशयित वाहने तपासणी करीत असतांना करण चौफूली जवळ तळोदा-निझर शहराकडे जाणा-या रोडवर एक पांढ-या रंगाचे टाटा मांझा वाहनास हात देऊन थांबण्यास सांगितले असता सदरचे वाहन हे न थांबता ते तळोदा रोडकडे भरधाव वेगाने निघुन गेले. त्यामुळे सदर वाहनावर संशय बळावल्याने वाहनाचा पाठलाग करुन त्यास थांबवून वाहनावरील चालक हा वाहन सोडून पळत असतांना त्यास शिताफीने पकडुन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव पंकज नामदेव चौधरी, वय 32 वर्षे, रा- साक्री नाका, नंदुरबार असे सांगितले व त्याचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 45 खाकी रंगाचे देशी दारुचे बॉक्स मिळून आले. सदर वाहनचालकास अधिकची विचारपूस करता त्याने सांगितले की, त्याने सदरचा मुद्देमाल हा जोगणीपाडा गावातील एका शेतातून आणल्याचे सांगितले व त्याचा साथीदार नामे प्रशांत विक्रम पाडवी असे संगणमताने बनावट दारु बनवून तिची चोरटी विक्री करीत असतात बाबत कळविले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकाने तात्काळ सदर जोगणीपाडा बोदडा रस्त्यावरील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन चेक केले असता पंकज चौधरी याचा साथीदार प्रशांत विक्रम पाडवी वय- 40 वर्षे, रा. जयहिंद कॉलनी, नंदुरबार हा मिळून आला. सदर ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये व शेतात बनावट दारुच्या बाटल्या व बनावट दारु बनविण्यासाठी लागणारी साहित्य असे एकूण 1,57,416/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
तरी सदरचा अवैध बनावट दारुचा साठा कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केला असुन दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोनही आरोपींकडुन एकुण 09 लाख 08 हजार 616 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात बनावट देशी दारु, बनावट दारु बनविण्यासाठीचे साहित्य, चोरटीविक्रीसाठी वापरण्यात आलेले वाहन, इ. असे जप्त करण्यात आले आहे. त्याअन्वये उपनगर पोलीस ठाणे येथे गुरनं- 174/2024 भादवि 328 वगैरे प्रमाणे तसेच महा. दारुबंदी कायदा कलम- 65(ई), 108 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होऊन पुढील अधिक तपास सुरू आहे..
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सपोनि श्री. दिनेश भदाणे, पोउपनि- श्री. मुकेश पवार, पोना/मोहन ढमढेरे, पोना/राकेश मोरे, पोना/विकास कापूरे, पोना/पुरुषोत्तम सोनार, पोशि/विजय ढिवरे, पोशि/शोएब शेख, पोशि / अभय राजपूत यांनी केली आहे.