या प्रकरणी ज्ञानेश्वर उत्तम वाघ रा कंजुर ता चाळीसगाव जि जळगाव यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक कैलास सुरेश पाटील रा ध्रुवनगर जि नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे व तीन जण जखमी झाले आहेत,मयताचे नाव १) राजू ओंकार बारेला वय ३० वर्ष रा. कर्जाना ता. चोपडा जि. जळगाव २) पोपट दत्तू ससाणे वय- ४० वर्ष रा. नाशिक
दुखापती :- १) ज्ञानेश्वर उत्तम वाघ रा. कुंजर ता. चाळीसगाव जि. जळगाव २) सुनिल बड्या पावरा वय- २० वर्ष रा. खर्डीखुर्देचा पाटीलपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार ३) कैलास सुरेश पाटील (चालक) वय- ३८ वर्ष रा. ध्रुवनगर ता. जि. नाशिक
यातील वाहनावरील चालक याने त्याचे ताब्यातील पिकअप वाहन क्र. MH-१८ AA ४७३३ हे भरघाव वेगाने हयगयीने अविचाराने रस्त्याचा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन बेदकारपणाने हयगयीने चालवून घेवून जात असतांना वाहन गमणचा उमरपाडा भागातील देवनदीत पडून अपघात करून वरील मयताचे मरणास व स्वत:चे व इतरांचे दुखापतीस तसेच वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणून भादवी कलम ३०४,(अ),२७९,३३७,३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि प्रकाश वानखेडे ,पोउनि सागर गाडीलोहार तपास करीत आहेत.