Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शासकीय कामात अडथळा निर्माण व कर्मचा-यांना मारहाण करणा-यास मा. न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावास व रुपये ३,०००/- दंड ठोठावला.

नंदुरबार दि १० (प्रतिनिधी) शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कर्मचा-यांना मारहाण करणा-यास मा. न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावास व रुपये ३,०००/- दंड ठोठावला.

फिर्यादी स्वप्नील निंबा बागले, वय-२५ व्यवसाय नोकरी रा. म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार हे महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी, शहादा येथे तंत्रज्ञ म्हणून नोकरीस असतांना दि. २२/०३/२०१९ रोजी फिर्यादी हे त्यांचे विभागाचे वरीष्ठांचे आदेशान्वये शहादा शहरातील हरिओम नगर येथे वीजबिल वसूली कामी गेले होते, सदर हरिओम नगर येथील रहिवासी मनोहर हरीचंद्र इंदाईत वय ३४ रा.शहादा यांचेकडेस माहे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वीजबिल थकीत असल्याने मनोहर इंदाईत यांना सदरचे बील भरणेबाबत फिर्यादी यांनी सांगितले असता त्यांनी दोन दिवसांत बील भरतो बाबत सांगितले. परंतू सदर मनोहर इंदाईत यांनी यापुर्वी देखील अशाच प्रकारे बील भरतो बाबत सांगून त्यावेळी देखील बील भरले नव्हते. त्यामुळे आज रोजी फिर्यादी स्वतः व त्यांचे सहकारी असे मनोहर हरिचंद्र इंदाईत यांचेकडील विदयुत पुरवठा खंडीत करीत असतांना सदर आरोपी मनोहर इंदाईत यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन दुखापत केली. त्याअन्वये शहादा पोलीस ठाणेत गु.र.नं. १०६/२०१९ भा.द.वि. ३५३,३३२,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक  शिवाजी बुधवंत यांनी सदर गुन्हयाचा तपास पोउपनि- डी.जे.बडगुजर यांचेकडेस दिला. पोउपनि डी. जे. बडगुजर व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्‌तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोहर हरीचंद्र इंदाईत वय ३४ रा. शहादा याचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. सत्र न्यायालय, शहादा यांचे न्यायालयात सादर केले होते.
     सदर खटल्याची सुनावणी मा.श्री. एल.डी.हुळी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांचे समक्ष झाली आहे. सरकारी पक्षाचे वतीने सहा. सरकारी अभियोक्ता ॲड. आर.पी. गावीत यांनी काम पाहीले आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने मा.श्री.एल.डी.हुळी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांनी आरोपीतास भा.द.वि.क. ३५३.३३२,५०४ अन्वये दोषी ठरवत प्रत्येकी २ वर्ष सश्रम कारावास व रुपये ३,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
        खटल्याचे सुनावणी दरम्यान पोउपनि सागर नांद्रे, पोउनि छगन चव्हाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून तसेच पैरवी अंमलदार पोहेकॉ/१२४ परशूराम कोकणी व पोकॉ/११७७ देविदास सूर्यवंशी यांनी कामकाज पाहीले आहे. सदर गुन्हयातील तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी अभियोक्ता यांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.