तळोदा दि ९ (ता प्र)ताडीचा कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा गुप्तांगावर हाताबुक्क्यानी मारुन खून झाल्याची खळबळजनक घटना बुधावल गावात घडली असून याप्रकरणी तळोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिली माहिती अशी की, दि.०८/०४/२०२४ रोजी रात्री१२ वाजेच्या सुमारास गणेश बुधावल गावी मयत कुशल नोमा चौधरी वय 17 वर्षे हा घरी असतांना यातील अनिल केलुसिंग पाडवी व त्याचे सोबत गावातील आकाश नारायण पाडवी, सागर अमरसिंग पाडवी, विकास कैलास चौधरी असे येवून आरोपी अनिल केलुसिंग पाडवी याने मयत कुशल यास ताडी आहे का? बाबत विचारपुस केली असता मयत कुशल याने आरोपी यास अरे गांडा आम्ही ताडी विकणे बंद केले आहे. असे बोलला असता त्या बोलल्याचा आरोपी अनिल पाडवी यास राग आल्याने तो मयत कुशल याचे सोबत भांडण करून वाईट साईट बोलू लागला तेव्हा यातील फिर्यादी व त्याचे सोबत असलेले गावातील आकाश नारायण पाडवी, सागर अमरसिंग पाडवी, विकास कैलास चौधरी असे त्याचे भांडण सोडवित असतांना त्या बोलण्याचा अनिल पाडवी यास राग आल्याने रागाचे भरात आरोपी अनिल पाडवी याने मयत कुशल याचे लघवीचे जागेवर हाताने जोराने ठोसा मारून त्यास जिवे ठार मारले आहे.
यात कुशल नोमा चौधरी वय 17 वर्षे रा. गणेश बुधावल हा मयत झाला आहे. फिर्यादी कुसुम धनराज पाडवी वय २७ वर्षे व्यवसाय - मजुरी रा.नवागाव आरोपी- अनिल केलुसिंग पाडवी वय ३९ वर्षे रा. गणेश बुधावल ता.तळोदा पो.स्टे. फौ.गुर.नं १४९ /२०२४ भादंवि कलम -३०२,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि राजेंद्र जगताप हे करीत आहेत.