सातपुडा मिरर न्युज वर्षपूर्ती!!
पाच लाखांवर वाचकांची पसंती!
संपादकीय
गेल्या वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला आम्ही आपल्या सेवेत, समाजातील घडणाऱ्या घटना, प्रश्न,शासन दरबारी कामांचा होणारा खोळंबा, अडवणूक,फसवणुक,
राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक, आरोग्य, यावरील प्रश्न, यांतील विकास, विविध कार्यक्रम,सण, उत्सव, व्रत, वैकल्ये, सामाजिक उपक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम,क्राईम, अशा विविध विषयांवर वृत्त संकलन व प्रसिद्धीचे कार्य करीत एक वर्षाचा टप्पा गाठला आहे .
पत्रकारिता म्हणजे सतीचे वाण घेऊन मार्गस्थ होताना वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, मित्र परिवार यांनी केलेली मदत, मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच सातपुडा मिरर न्युज नेटवर्क ला पसंती असलेल्या वाचकांची संख्या पाच लाखांच्या वर पोहचली ही आमच्यासाठी अभिमानाची व करीत असलेल्या कार्याची पावती आहे.आपण सर्वांचे स्नेह व सहकार्य असेच लाभत राहो हिच अपेक्षा.सर्व वाचक, हितचिंतक यांचे जाहीर आभार व नववर्ष गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!