Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोकसभा- हैदराबाद असदुद्दीन ओवेसी च्या प्रतिस्पर्धी उमेदवार माधवी लता हिस झेड प्लस (Z+) सुरक्षा

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि ८
     हैदराबाद भाजपच्या उमेदवार माधवी लता यांना केंद्र सरकारने 'Y+' श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
IB च्या धमकीच्या अहवालानंतर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय घेतला आहे.माधवी लता या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. आयबीच्या धमकीच्या अहवालानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आल्याचे बोलले जात आहे. माधवी लता या सोशल मीडियावर हिंदुत्व समर्थक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तिहेरी तलाकवरील विधानांमुळे प्रसिद्धीझोतात आल्या, त्या आता ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
       सहा सीआरपीएफ अधिकाऱ्यांसह 11 सुरक्षा कर्मचारी नेहमीच तिच्यासोबत असतील ती असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. पीएम मोदींनीही तिचं कौतुक केलं.
 निवडणुकीच्या घोषणेपासून ते निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत हैदराबाद ची लोकसभेची जागा त्यांच्या उमेदवारांमुळे चर्चेत राहते. 
     हैदराबादची जागा जवळपास चार दशकांपासून ओवेसी कुटुंबाकडे आहे. सध्या एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी या मतदारसंघातून चार वेळा खासदार आहेत.
     ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी 1984 ते 2004 पर्यंत या जागेवर खासदार होते. विधानसभेच्या सात जागा असलेल्या हैदराबाद लोकसभा जागेवर सुमारे १९ लाख मतदार आहेत.
        मात्र या निवडणुकांमध्ये ही जागा भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यामुळेही चर्चेत आहे.