नंदुरबार दि. ८ (प्रतिनिधी ) नंदुरबार लोकसभा निवडणूक २०२४ मतदार संघाच्या नवापूर मतदार संघात जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनीषा खत्री, जिल्हा परिषद नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या आदेशानुसार स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी नवापूर तालुक्यात मॅरेथान स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली होती. 
नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील मैदानावर मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग नवापूर आयोजीत तालुकास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे ,.आर आर देसले अधिक्षक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तथा शिक्षण विस्तार अधिकारी, श्रीमती रेखा पवार मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते झाले.
शिक्षणशास्त्र महाविद्यालय परिसरातून या भव्य रॅलीला सुरवात झाली. कनिष्ठ महाविद्यालयातील शंभरहुन अधिक विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदवला. मॅरेथॉन रॅलीच्या पुढील बाजूस असणाऱ्या विविध संदेश घोषणा देण्यात आल्या. याशिवाय विद्यार्थ्यांच्या हातात असणाऱ्या फलकावर तुमचं मत हे तुमचं भविष्य आहे, मतदान हे कर्तव्य आहे, मतदान माझा अधिकार मतदान माझं कर्तव्य, मतदान केंद्र जाऊंगा, उज्वल भविष्य लाऊंगा, मतदान आपली जबाबदारी व अधिकार योग्य करा वापर यासारखे संदेश देण्यात आले होते, परिसरात जाणाऱ्या प्रत्येकाचे या संदेशांनी लक्ष वेधले होते. यावेळी विद्यार्थी, स्वयंसेवकांनी नागरिकांना मतदान करा, लोकशाही टिकवा तसेच मतदान आपला हक्क व अधिकार आहे अशा घोषणा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अंमलबजावणी करिता शिक्षण विस्तार अधिकारी श्री रमेश देसले यांनी मार्गदर्शन करून मतदान करण्याबाबतच्या व मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत मतदान जनजागृती चे महत्व पटवून दिले. शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालय येथे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य, पालक प्रबोधन तसेच इतर विविध मतदान जनजागृती चे उपक्रम घेण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश चौरे यांनी यावेळी दिली. सदर स्पर्धेसाठी तालुक्यातील शिक्षक बांधव व महीला शिक्षक भगिनी, सर्व केंद्रप्रमुख साहेब, सर्व व्यवस्थापनचे मुख्याध्यापक ,बँकेचे अधिकारी , पोलिस भरतीसाठी सराव करणारे युवा खेळाडू इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभागी झाले. नवापूर तालुका डाॅ. असोसिएशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष मा. डाॅ. अमित मावची सर व डाॅ. जयवंत गिरासे सर, बँक ऑफ बडोदा शाखा उमराणचे शाखाधिकारी देसले साहेब, प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, बोरवण केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप गावित,भादवड केंद्राचे केंद्रप्रमुख के. टी सूर्यवंशी साहेब यांनी उपस्थित राहुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेत मतदान जनजागृतीपर आधारीत स्वरचित गीत किसन ठोंबरे यांनी सुंदर आवाजात सादर केले. श्रीमती सरला पाटील मॅडम यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीबाबत घोषणा देवून वातावरण निर्मिती केली. शरद गावीत यांनी उपस्थितांना मतदान शपथ दिली.
सदर स्पर्धेत पुरूष गटात प्रथम क्रमांक श्री.जाधव सर, द्वितीय क्रमांक.भाईदास पावरा, तृतीय क्रमांक .शरद गावीत यांनी पटकवला. शेवटी आभार मानून भव्य अशी तालुकास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धा पार पाडली. यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे ५०% शिक्षक महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.