नंदुरबार दि ८ (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने स्वीप उपक्रम अंमलबजावणी अंतर्गत मतदार जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत वोटकर-नंदुरबारकर मतदार जनजाग़ृती मतदाता दौड चे आयोजन नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्याजवळील पोलीस मैदाना मध्ये करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या दौड मध्ये 20 वर्षाच्या आतील विद्यार्थी गट, विद्यार्थीनी गट, पुरुष गट व महिला गट अशा चार गटांमध्ये स्पर्धक सहभागी झाले होते. पोलीस मैदानावरुन ट्प्प्या-टप्प्याने चार गटांमध्ये मतदाता दौड स्पर्धा हिरवी झेंडी दाखवून सुरु होऊन शहरातील एकलव्य विद्यालय मार्ग, नगरपालिका, अंधारे चौक, स्टेट बॅक या मार्गाने श्रॉफ हायस्कुल येथे स्पर्धा समाप्त करण्यात आली.
स्पर्धे मध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, भावेश सोनवणे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील पंचायत समितीचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी माध्यमिक व प्राथमिक शाळेमधील कार्यरत शिक्षकांपैकी 50 टक्के शिक्षक यांनी मतदाता दौड मध्ये सहभाग घेतला. निश्चित केलेल्या मार्गावरुन घोषणा देत स्पर्धक दौड मध्ये उत्साहाने सहभागी झाले. दौड सुरु करण्यापूर्वी सर्व उपस्थित स्पर्धकांना मतदानाची सामुहिक शपथ देण्यात आली.
स्पर्धे मध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांची नावे मतदाता दौडच्या समारोप प्रसंगी श्रॉफ हायस्कुल येथे जाहिर करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते विद्यार्थींनीनी तयार केलेल्या निवडणूक विषयक पोस्टरचे प्रकाशन तसेच श्रॉफ हायस्कुलच्या शिक्षकांनी उभारलेल्या मतदान गुढीचे पुजन करण्यात आले.
मतदाता दौड यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक डॉ. मयूर ठाकरे, मिनल वळवी, श्रीराम मोडक, जितेंद्र पगारे, राजेश शाह, धनराज अहिरे, दिनेश सुर्यवंशी, पंकज पाठक, सुनिल पाटील, धोंडीराम शिनगर, खुशाल शर्मा, मनिष सनेर यांनी संयोजन केले तर सैय्यद इसरार व बाळू कोकणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य निंबा माळी यांनी केले तर आभार प्राचार्य सुषमा शाह यांनी मानले.
दौड मध्ये यशस्वी स्पर्धक-
1) 20 वर्ष आतील मुले-
प्रथम क्रमांक- प्रणील प्रकाश सोनवणे
दुसरा क्रमांक-सोमनाथ नामदेव वळवी
तीसरा क्रमांक- वैभव अरुण पाटील
चौथा क्रमांक- विशाल शांताराम तडवी
पाचवा क्रमांक- ओम राजू पाडवी
2) 20 वर्ष आतील मुली-
प्रथम क्रमांक- दिव्या पंकज पाटील
दुसरा क्रमांक- स्वाती रमेश पाटील
तीसरा क्रमांक- हर्षदा पावबा कोळी
चौथा क्रमांक- प्राची प्रदीप पाटील
पाचवा क्रमांक- स्नेहा कैलास घोडसे
3) खुला गट पुरुष-
प्रथम क्रमांक- भगतसिंग प्रतापसिंग पाडवी
दुसरा क्रमांक- करणसिंग उखा चव्हाण
तीसरा क्रमांक- निलेश संजय जावरे
चौथा क्रमांक- सुधीर रघुवीर सोनवणे
पाचवा क्रमांक- विजय बापू अहिरे
4) खुला गट महिला -
प्रथम क्रमांक- वैशाली अशोक पाटील
दुसरा क्रमांक- सोनल निंबा बोरसे
तीसरा क्रमांक- नेहा भरत पाटील
चौथा क्रमांक- डॉ. वैशाली शांताराम शिंदे
पाचवा क्रमांक- मोनाली हिम्मत पाटील