नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना मत म्हणजे मोदींना मत असून मोदींची गॅरंटी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमरीशभाई पटेल यांनी केले
ते पुढे म्हणाले,नंदुरबार लोकसभेची आता चिंता नाही. डॉ. गावितांच्या मागे शिरपूर शहर व तालुका ठामपणे उभा आहे. मोदी सरकारच्या काळात गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. मोदी देशाला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करीत असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयासाठी सर्वांनी एकदिलाने, एकमनाने प्रयत्न करावेत असे आवाहन माजी मंत्री आ. अमरीशभाई पटेल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचा वर्धापनदिन सहा एप्रिलला येथील भाजप कार्यालयात पक्षाचे ध्वजारोहण व जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन करून साजरा करण्यात आला. तसेच भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. अमरीशभाई पटेल यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याहस्ते पक्ष ध्वजारोहण करण्यात आले. माजी आमदार कै. प्रल्हादराव पाटील यांचे प्रतिमा पूजन आ. काशिराम पावरा यांनी केले. नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे, तालुकाध्यक्ष किशोर माळी, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा उपस्थित होते.
'राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः' हा विचार घेऊन पक्षाच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्ता काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश सर्व स्तरांमध्ये प्रगती करतो आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेला एकात्म मानवतावादाचा विचार अमलात आणत, लोककल्याणासाठी मोदी सरकार दिवसरात्र काम करत आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात भारतीय जनता पार्टी अतिशय सशक्तपणे पोहोचली व रुजली आहे. भारतीय जनता पार्टीचा हा विस्तार अखंडपणे चालू राहावा, यासाठी आपण सर्वांनी अविरतपणे काम करू या असे आवाहन बबनराव चौधरी यांनी केले.
पक्ष स्थापनेपासून आजतागायत कार्यरत असलेले बबनराव चौधरी यांचा विशेष सत्कार आ.पटेल यांनी केला. ज्येष्ठ कार्यकर्ते एन.डी.पाटील यांचा गौरव आ. काशीराम पावरा यांच्याहस्ते करण्यात आला. बाजार समिती सभापती के. डी. पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, प्रताप सरदार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप राजपूत, ॲड. प्रताप पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस श्याम ईशी, जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, गणेश जैन, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, जिल्हा चिटणीस अजिंक्य शिरसाठ, शहराध्यक्ष विक्की चौधरी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा चिटणीस जाकीर तेली, शहराध्यक्ष रफीक तेली, पिपल्स बॅन्क संचालक संजय चौधरी, महेश चौधरी, दुर्गेश चौधरी, भटु माळी, भालेराव माळी, माजी नगर सेवक रज्जाक कुरेशी, राजु एजंट, बापु थोप्त, राज सिसोदिया, पिंटु माळी, पिं शिरसाठ, किशोर चव्हाण, अनिल (मामा) पाटील, अविनाश शाह, रविंद्र राजपुत, पप्पु राजपुत, अमोल पाटील, राजुलाल मारवाडी, राधे चौधरी, भुरा पाटील, राहुल महाले, भुपेश अग्रवाल, दिलीप धमाणी, अरुण येशी, अनिल बोरसे,अर्जुन चौधरी, रमेश चौधरी,यश पाटील आदि उपस्थित होते.जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी सूत्रसंचलन केले. तालुका प्रभारी हेमंत पाटील यांनी आभार मानले.