पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश सायसिंग तडवी रा जामली पाटीलपाडा, यांच्या फिर्यादीवरून गिरीष काल्ला तडवी, भुरा काल्ला तडवी,आपसिंग काल्ला तडवी,भरत काल्ला तडवी,नानसिंग काल्ला तडवी , गंगाराम नानसिंग तडवी, निलेश काल्ला तडवी, दिनेश काल्ला तडवी, फोक्या नानसिंग तडवी सर्व रा. जामली ता. अ.कुवा जि. नंदुरबार यांच्या विरोधात
महू झाडाचे फुले वेचण्याच्या कारणावरुन वाद झाला व
यातील आरोपीत मजकूर यांनी महू झाडाचे फुले वेचण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीस हाताबुक्यांनी मारहाण करून यातील आरोपी क्र. ३ याने फिर्यादीचे हनुवटीवर दगडाने मारून दुखापती केले तसेच आरोपी क्र. ०२,०४,०५,०६ यांनी देखील दगडाने डोक्यास, पाठीवर, कमरेवर मारहाण केली तसेच यातील आरोपी क्र. ०७, ०८,०९ यांनी हाताबुक्यांनी मारहाण करून सर्वानी जिवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून मोलागी पोलिसात ६१/२०२ ४ भादवि कलम ३२४,३२ ३,१४३, १४७,१ ४९,५० ४,५०६, कम एम.पो. का. पेन च्या ३७ (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सपोनि प्रकाश वानखेडे, तपास पोह आधार सोनवणे करीत आहेत.