Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार ,संचलित डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे " जल्लोष " समर कॅम्प कार्यक्रम संपन्न

 नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार ,संचलित डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे " जल्लोष " समर कॅम्प कार्यक्रम संपन्न 
नंदुरबार दि २४ (प्रतिनिधी) डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार येथे दि. १२ ते २४ एप्रिल २०२४ या १० दिवशीय 'जल्लोष' समर कॅम्प समारोप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. नरेंद्रभाई सराफ हे होते. नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक, पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून करण्यात आली.
     सदर दहा दिवसीय समर कॅम्प मध्ये वारली पेंटिंग, योगासन व प्राणायाम, झटपट मेकअप, हेअर स्टाईल, नऊवारी साडी, हॉर्स रायडिंग, आनापान साधना, पायदान (डोअर मँट), गणपती तयार करणे, हस्तकला, मनोरंजनात्मक खेळ, रांगोळी काढण्याच्या पद्धती, मेंदी काढणे, सी. बी. गार्डन वॉटर पार्क व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम घेण्यात आले. सदर उपक्रमासाठी विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे. निकिता नानाजी अहिरे या विद्यार्थिनीने कॅम्प मध्ये आलेले अनुभव व्यक्त केले. 
         नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. नरेंद्रभाई सराफ व कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक, विद्यार्थीनी पालक धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यिनींना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थिनींना भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास समर कँम्पमध्ये सहभागी विद्यार्थींनीचे पालक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. सदर प्रसंगाचे औचित्य साधून उपस्थित पालकांसमवेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी यांनी मतदानाची सामुहिक शपथ घेतली. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सीमा मोडक व सूत्रसंचालन हेमंत बोरसे यांनी केले. जितेंद्र पगारे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय केला. भेटवस्तू व प्रमाणपत्र विद्यार्थिनी यादी वाचन संजय चौरे यांनी केले. शांताराम पाटील यांनी आभार मानले.