प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे आदेश
April 25, 2024
नंदूरबार दि २५ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरण : अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश फिर्यादी तेजाबसिंग पाडवी, स्थानिक गुन्हे शाखा - नंदूरबार, यांनी आरोपी रविंद्र दुमकुळ, राहणार तालुका तळोदा व इतर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे - तळोदा, येथे गुन्हा भा. द. वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम २६ ,३० प्रमाणे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी की, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला होता. आरोपी यांचे दुकानात प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण करून ठेवलेला होता. पोलिसांनी विचारणा केली असता इतर आरोपींचे नाव सांगण्यात आले होते. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करून पंचनामा करण्यात आला होता. अर्जदार रविंद्र दुमकुळ, राहणार तालुका तळोदा, यांनी सदर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी माननीय सत्र न्यायालय शहादा येथे फौजदारी जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू, माननीय सत्र न्यायालय शहादा यांनी सदर फौजदारी जामीन अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध अर्जदार यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (माननीय न्यायमूर्ती श्री. नितीन बी. सूर्यवंशी) यांनी दिनांक २४.०४.२०२४ रोजीच्या आदेशान्वये अटी व शर्तीसह अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत. अर्जदारातर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.