Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल - विजयी होण्याचा विश्वास व्यक्त

सुशिलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल 
नंदुरबार दि २५ (प्रतिनिधी)
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आज २५ एप्रिल २०२४ रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जिल्हाधिकारी नंदूरबार मनिषा खत्री यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला व उमेदवार म्हणून शपथ घेतली. 
          नंदूरबार लोकसभाश्रॆत्र भ्रष्टाचार मुक्त करणे,रस्ते खड्डेमुक्त करणे,व्यसनमुक्त करणे,१०० पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे,५ वी ,६ वी अनुसूचि लागू करणे,१०० वनदावे मंजूर करणे, डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे अशे उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. भाजप व काँग्रेस उमेदवारांचे अद्याप निवडणूकीचे ध्येय ठरलेले नाहीत. पक्षाच्या केंद्रीय कमिटीने ठरविलेले जाहीरनामे वाॅटसप वर फिरताना दिसतात. नंदूरबार लोकसभाश्रॆत्रासाठी भाजप व काँग्रेस चे निश्चित ध्येय नाहीत. परंतु आम्ही सर्व सामान्यांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवत आहोत. 
                         ही निवडणूक नक्कीच आम्ही जिंकू. अशी प्रतिक्रिया बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली.