नंदुरबार दि. १९( प्रतिनिधी) नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.दि १८ रोजी पहिल्या दिवशी ९ उमेदवारांनी ३० उमेदवारी अर्ज विकत घेतले आहे. मात्र, एकाही उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १३ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी दि.१८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या ९ उमेदवारांनी एकुण ३० उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. भाजपाच्या खा. डॉ.हीना विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित व मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रत्येकी ४ असे १२ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गोवाल के.पाडवी, आमदार के.सी.पाडवी व श्रीमती हेमलता के. पाडवी यांनी प्रत्येकी ४ असे १२ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. पिपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रेटीकच्या
श्रीमती निर्मला कागड्या वसावे यांनी ३, अपक्ष उमेदवार सुशिलकुमार जहांगिर पावरा यांनी २ तर अपक्ष गोपाल सुरेश भंडारी यांनी १ अशा एकुण ९ उमेदवारांनी ३० उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. मात्र, एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी
अर्ज दाखल केलेला नाही.