Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

योगशिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांची फेरनियुक्ती

योगशिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांची फेरनियुक्ती

नंदुरबार दि १९ (प्रतिनिधी) येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सेंट मदर तेरेसा योग विद्याधामचे केंद्र प्रमुख डॉ. संजय शिंदे यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार व राज्य कार्यकारणीने योगशिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यपदी फेरनियुक्ती केली आहे. 
              डॉ. शिंदे यांनी पीएच.डी (शिक्षणशास्त्र), पीएच.डी (मराठी) एम.ए (कम्युनिकेशन), एम.ए (योगशास्त्र) शालेय व्यवस्थापक पदविका, योगशिक्षक पदविका, समंत्रण पदविका अशा विविध विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. "नंदुरबार जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी योगाभ्यासाच्या परिणामकारकतेचा अभ्यास" या विषयावर कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विदयापीठ रामटेक नागपुर विदयापीठातून संशोधन कार्य केले आहे. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय नियतकालिकांमधून शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहे. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे "योग व आरोग्य" या विषयावरील मुक्त विदयापीठातील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुक्त विदयापीठाचे तत्कालिक कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन व आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गुणगौरव करण्यात आला होता. शास्त्रोक्तपध्दतीने मिळवलेल्या योगाच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा म्हणून डॉ. शिंदे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, शिबीरे घेवून सातत्यपूर्ण योगभ्यासाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यांच्या फेरनियुक्ती बद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष विंक्रांतबाबा मोरे, सचिव डॉ. अभिजीतदादा मोरे, प्राचार्य डॉ. सतिष देवरे, डॉ. रविंद्र पाटील, प्राचार्या जयश्री ॲलेक्स, डॉ. मनोज निलपवार (यवतमाळ) डॉ. संजय ढोले (पुणे), डॉ. योगेश कुलकर्णी (नाशिक), डॉ. राजेश पाटील जळगांव, डॉ. जितेंद्र भामरे (धुळे), डॉ. श्रीकांत वाडिले (शिरपूर), डॉ. योगेश नांद्रे (पिंपळनेर), योग शिक्षक संघाचे महासचिव शांताराम पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी (तळोदा) यांच्यासह महाराष्ट्रातील योगप्रेमी, योग शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.