तळोदा दि १९ (प्रतिनिधी) भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पावन जन्म दिवस देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला.
याप्नंरसंगी दुरबार लोकसभा मतदारसंघात देखील खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते महाआरती करून रामनवमी चा महाउत्सव साजरा करण्यात आला. जय जय श्रीराम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला.. तळोदा येथे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर महाआरती करण्यात आली.
जल्लोषात पार पडलेल्या या रामनवमी महोत्सवात खासदार डॉक्टर हिनाताई गावित, भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी, योगेश चौधरी, गौरव वाणी, विलास डांबरे, हेमलाल मगरे, शिरीष माळी,
यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिवंत देखावे आणि चित्ररथ यांनी लक्ष वेधले. तळोदा येथील या उत्सवामध्ये शेकडोच्या संख्येने राम भक्तांनी सहभाग घेतला. राम भक्तांच्या उपस्थितीने प्रमुख रस्ते व्यापले होते.