#डॉक्टर हिना गावित यांची चमकदार कारकीर्द#
महा संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहे. याआधी 2014 या वर्षी त्यांनी प्रथमच लोकसभा निवडणूक लढविली होती आणि नंदुरबार लोकसभा मतदार संघातील प्रस्थापित काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून निवडून येण्याचा विक्रम स्थापित केला. नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या रूपाने पहिला खासदार निवडून आला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात खासदार पदी निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात रेल्वे दुहेरीकरण, मोफत गॅस वाटप आणि तत्सम विक्रमी विकास कामांमुळे आणि मोदी सरकारच्या आदिवासी अभीमुख धोरणांमुळे त्यांची पहिली कारकीर्द लोकप्रिय ठरली. 2019 यावर्षी दुसऱ्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी पुन्हा मोदी लाटेसमवेतच त्यांनी केलेल्या कामांमुळे दुसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी स्थापन केला. आदिवासी भागातून प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे या दुसऱ्या पंचवार्षिक कार्यकाळात खासदार डॉक्टर हिना गावित यांनी लोकसभेमध्ये विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली प्रश्न मांडले आणि मोदी सरकारमधील अभ्यासू खासदार अशी त्यांची प्रतिमा बनली. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन मोदी सरकारने जलजीवन मिशन आणि महिला सुरक्षा सारख्या राष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांचे प्रमुख पद सोपवले, विदेशातील अभ्यास दौऱ्यांची जबाबदारी आणि कार्यभार सोपवला. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा स्थापन झाली. दहा वर्षाच्या कारकिर्दीत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेली भाषणे मांडलेले प्रश्न आणि आदिवासी भागातील समस्यांवर उठवलेला आवाज लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने यंदा त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. सलग तीन वेळा निवडून येण्याची म्हणजे हॅट्रिक स्थापन करण्याची संधी मतदार त्यांना देतील का हे आता पुढे पाहायला मिळेल.