Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात. केंद्रीय निरीक्षण कमिटीच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत निर्णय ‌.

लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वळवी रिंगणात. 
        केंद्रीय निरीक्षण कमिटीच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत निर्णय ‌
    सातपुडा मिरर न्युज नेटवर्क दि २२
                 नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत जिल्ह्यातील विविध संघटना व युवकांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उमेदवार जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असलेले रविंद्र वळवी हे भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढविणार आहे. 
        लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तळोदा येथे पुन्हा भारत आदिवासी पार्टीच्या केंद्रीय कमिटीच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी भारत आदिवासी पार्टीचे निरीक्षक तथा महासचिव जितेंद्र असलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड.अभिजित वसावे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा पवार, जिल्हाध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे, ॲड.संग्राम पाडवी, साया वसावे, खेमसिंग वळवी, धिरसिंग वळवी, प्रमोद ठाकरे, ॲड.कुशाल वसावे, कृष्णा मोरे यांच्यासह आठही तालुक्यांचे पदाधिकारी व युवक उपस्थित होते.
चौकट 
     पक्षीय परंपरा टाळण्यासाठी उमेदवार
         आज जिल्ह्यात काही पक्ष कार्यरत असून राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक आदिवासी त्यात जोडले गेले आहेत. त्यांना समाजाचा खरा विचार करण्याऐवजी पक्षांच्याच अटीनुसार चालावे लागते. एवढेच नव्हे तर बहुतांश नेते-पदाधिकारी केवळ पक्षांशी जोडलेले गेले नाही तर ते थेट त्यांच्या दावणीला बांधलेही गेले आहे. त्यांच्यावर पक्षांचे आदेश लादले जात असल्याने ते नेते-पुढारी समाजहिताच्या बांबीं कडे दुर्लक्ष करतात. ही एक परंपरा रुढ झाली असून तिला फाटा देण्यासाठी आम्ही भारत आदिवासी पार्टीचा उमेदवार देत असल्याचे प्रदेश सचिव सुनील गायकवाड यांनी सांगितले.
चौकट 
       देशात सात राज्यात भारत आदिवासी पार्टी चे उमेदवार उभे करण्यात आले असून महाराष्ट्रात देखील सात लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. संविधान वाचविण्यासाठी व सर्वधर्मसमभाव तसेच प्रकृती वाचावी यासाठी आम्ही भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार उभे करून लोकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
     
       सुनिल गायकवाड
        प्रदेश सचिव
  भारत आदिवासी पार्टी