डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार येथे १२ ते २४ एप्रिल २०२४ या १० दिवशीय 'जल्लोष' समर कॅम्पचे मुख्याध्यापिका सीमा मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. त्यात दररोज विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. आज आठव्या दिवशी कौशल्य विकसन, स्वयंरोजगार उपक्रमांतर्गत पायदान (डोअर मँट) तयार करणे हे कौशल्य विद्यार्थिनींनी शिकुन प्रत्येक विद्यार्थिनींनी दोन पायदान स्वतः तयार केले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
प्रसंगी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक,लायन्स फेमिना क्लबच्या हिना रघुवंशी,पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक संजय चौरे,नंदिनी बोरसे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते. लायन्स फेमिना क्लब नंदुरबार यांच्याकडून विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सीमा मोडक व सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले. जितेंद्र पगारे यांनी आभार मानले.