( कोटमगाव विठ्ठलाचे ) ता
येवला दि २(प्रतिनिधी)येवला गावाने आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेत येवला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून आज रोजी गाव दहा लाखांच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे देवळा पं. स. गट विकास अधिकारी वेंद्रे, विस्तार अधिकारी मांडवडे यांच्या सहयोगातील येवला गटविकास अधिकारी,अभिजित पाखरे, अंगणवाडी सुपरवायझर व समितीचे सदस्य , यांनी याबाबत तपासणी केली होती ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले, आहे स्वच्छता जलसंधारण दारूबंदी आरोग्य महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गावाने विधायक उपक्रम हाती घेत संपूर्ण तालुक्यात स्वच्छ गाव सुंदर गाव अशी ओळख निर्माण केली आहे.
उत्कृष्ट पारदर्शकता, वृक्षारोपण यात सर्व ग्रामस्थांचा व युवकांचा सहभाग व मोलाचा वाटा आहे हे बक्षीस मिळविण्यासाठी मैलांचा दगड ठरले आहे गावात भूमिगत गटारी करण्यात आली आहेत लोकसभागातून सुमारे 1361 झाडांची लागवड करण्यात आली असून व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालयाचा नियमित स्वच्छ वापर व स्वच्छता राखण्यात ग्रामपंचायत संपूर्णतःहा अग्रेसर आहेत असे मत, लोकनियुक्त सरपंच श्री. राजेंद्र चिंतामण पाटील काकाळीज यांनी बोलताना सांगितले आहे. सदर गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या सहभागातून गावाने विकासाच्या दृष्टीने पावले टाकली असून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांचा सकारात्मक सहभाग महत्त्वाचा असून तो मिळत आहे असे मत सरपंच श्री. राजेंद्र चिंतामण पा.काकळीज यांनी यावेळी नमूद केले आहेत.