पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 28.03.2024 रोजी संध्याकाळी 4.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिची मूलगी ही फिर्यादीचे दिर याचे घरी जात असतांना रस्त्यात मालसिंग दाना पावरा यांचे शेताजवळ यातील आरोपीत लेह-या शंकर पावरा हा फिर्यादीच्या मागुन आला व फिर्यादीचे तोंड दाबुन धरुन फिर्यादीस ओढतओढत मालसिंग दामा पावरा यांचे बाजरीच्या शेतात जबरदस्तीने तोंड दाबून जबरदस्तीने शारीरीक संबंध केले सदर महिलेच्या फिर्यादीवरून लेह-या शंकर पावरा रा. रोझवा पुनर्वसन याचा विरोधात तळोदा पोलिस स्टेशनला फौजदारी भा.द.वि.कलम 376, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर दाखल केला असून
सदर गुन्हयाचे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांचे आदेशान्वये पोसई धर्मेंद्र पवार करीत आहे.