Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुन्हेगाराला वाचवण्याचा नादात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा( एलसीबी) पोलिस निरीक्षकसह दोन पोलिस कर्मचारी अशा तिघा लाचखोर पोलीसांना लाच लुचपत प्रतिबंधकचा पथकाने रंगेहात पकडले

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क 
 धुळे, दि.३ गुन्हेगाराला हद्दपारी प्रस्ताव रद्द करुन त्यास सुट मिळवून देण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीच्या पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी नितीन मोहने व अशोक पाटील अशा तिघा लाचखोर पोलीसांना २ लाख रुपयांची लाच घेतांना दोंडाईचा येथे धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
            तर एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिंदे यांना यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एसीबीचे पोलिस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांनी दिली. 
      यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१ एप्रिल रोजी सायंकाळी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी नितीन मोहने व अशोक पाटीक या दोघांना दोन लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने दोंडाईचा येथे रंगेहात पकडले. यासंदर्भात दोघांची कसून चौकशी केली असता एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचा सांगण्यावरून पैसे घेतलेचा गौप्यस्फोट केला या गुन्ह्यात शिंदे यांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे त्यांना
सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान गृह शाखेच्या
कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. तिघांची एसीबीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यात तिघांनी तक्रारदार यांच्याकडून हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करून त्यांना अभय देण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात धुळे लाचलचुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने कायदेशीर पडताळणी अंती
 एसीबीच्या पथकाने दोंडाईचा येथे सापळा रचला होता. या सापळ्यात तक्रारदार यांच्याकडून पोलिस कर्मचारी नितीन मोहने व अशोक पाटील या दोघांनी दोन लाख रुपयांची लाचस्विकारताच दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले त्यांचा जबाबावरुन या लाचखोरीत पोलिस निरीक्षत दत्तात्रय शिंदे यांचा देखील सहभाग आढळून आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
       या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केल्यानंतर प्राप्त पुरावे व कायदेशीर बाबींची तपासणी केली असता तिघांनीही लाचखोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याअनुषंगाने तिघांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.