महाविकास आघाडीचे नंदुरबार लोकसभेचे उच्चशिक्षित उमेदवार एडवोकेट गोवाल के. पाडवी यांनी काल तळोदा दौऱ्यावर असताना महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकाऱ्यांना भेटून भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार अर्पण केला.
यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली, प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंगदादा पाडवी,कृउबा उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,केसरसिंग क्षत्रिय, तालुकाध्यक्ष संदीप परदेशी, काँग्रेसचे तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक,
तालुकाध्यक्ष नाथा पावरा, शिवसेनेचे आनंद सोनार, जितेंद्र दुबे, आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच पायी शहरातील बाजारपेठेत लहान-मोठे व्यवसायिकांना भेटून जिल्हाचा विकास करण्याचा दृढ़ विश्वास व्यक्त करत, तळोदा शहरातील मारुती मंदिरात जाऊन हनुमान जी चे दर्शन घेतले व भारताच्या विकासाच्या दृष्टीने प्रार्थना केली,लोकांकडून गोवाल दादा यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला जय गोवाल विजय गोवाल या घोषणेने पूर्ण परिसर दुमदुमुन गेले.