तळोदा दि ६(प्रतिनिधी) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ॲड गोवाल पाडवी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करत प्रचारात आघाडी घेतली आहे.यावेळी मित्र पक्षाचे पदाधिकारी ही उपस्थित होते
काँग्रेसने यावेळी भाजपाच्या खा हिना गावित यांना शह देण्यासाठी मोट बांधली असून भाजपात नाराज असलेल्यांना आपलेसे करत गावोगावी बाजारात, कार्यक्रमात संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सोशलमिडियावर आघाडी घेत कार्यकर्त्यांचे,विचाराधारा मानणारे, मित्रमंडळी असे अनेक गृप तयार करून खासदारांचा विरोधात वैचारिक परीवर्तन करण्याचा सपाटा सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून तळोदा येथे काॅलेज चौफुलीवर काँग्रेस पक्ष उमेदवार प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला आहे.यावेळी कार्यकर्ते व जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होती