Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" सण उत्सवाचे नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर दाखल होणार गुन्हा दाखल होईल - नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त

" सण उत्सवाचे नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा कराल तर दाखल होणार गुन्हा दाखल होईल असा इशारा दिला आहे"नागरिकांनी तक्रार दयावी, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे.

"आगामी सण उत्सवाच्या काळात व्यापा-यांसह सामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी घेणा-यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी दिले आहेत."
          सण उत्सवाच्या काळात वर्गणी हि स्वेच्छेने दयायची असते, परंतू काही व्यक्तींकडून सण उत्सवाच्या काळात जबरदस्तीने व्यापारी तसेच सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. असे जर कोणी जबरदस्तीने वर्गणी मागत असेल तर त्याबाबत पोलीस विभागास कळवावे, त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी केले आहे.