Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सांसदरत्न खासदार डॉ हीनाताई गावित यांना मोठ्या मताधिक्याने निवडुन देणार आणि विज़याचा गुलाल उधळणार - आमदार आमश्यादादा पाडवी

अक्कलकुवा दि ७ (प्रतिनिधी)नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार सांसदरत्न खासदार डॉ हीनाताई गावित यांना मोठ्या मताधिक्याने निवडुन देणार आणि ४ जून ला विज़याचा गुलाल उधळणार असे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार आमश्यादादा पाडवी यांनी केले.
            नंदुरबार लोकसभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ हिनाताई गावीत यांचा निवडणूक प्रचार नियोजन बैठक कालिका माता सभागृह अक्कलकुवा येथे  घेण्यात आली या प्रसंगी महा युतीचे प्रतीनिधी आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावीत विधानपरिषदेचे आमदार आमश्या दादा पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी , जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रीयाताई गावीत जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शंकर दादा पाडवी व उमेदवार डॉ हिना ताई गावीत तसेच महा युतीचे सर्व तोलामोलाचे पद अधीकारी व कार्यकर्त्यांचा उपस्थित बैठक पार पडली. 
         यावेळी उमेदवाराचा कामाचा आढावा, लोकसभेत प्रश्न मांडण्याची हातोटी, जिल्ह्यातील समस्या, सोडविण्यासाठीचे प्रयत्न याबाबत चर्चा करून पुनश्च डॉ हिनाताई गावीत यांना निवडून आणण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी यांनी प्रयत्न करण्याबाबत ठरविण्यात आले.