Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अस्तंबा ऋषि देवस्थान व डाब येथील आदिवासी कुल देवता देवमोगरा माता यांच्या चरणी रुढी परंपरा नुसार देवपूजा करून प्रचाराला सुरुवात

धडगाव दि १ (प्रतिनिधी)नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यात अस्तंबा ऋषि देवस्थान येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला व अक्कलकुवा डाब येथील आदिवासी कुल देवता देवमोगरा माता यांच्या चरणी रुढी परंपरा नुसार देवपूजा करून सुरवात झाली. 

आदिवासी संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. आदिम काळापासून आदिवासी निसर्ग पूजेच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण आणि सन्मान करत आहेत. हीच वैभवशाली संस्कृती आणि इतिहास जपण्याचे काम आपण करायचे आहे या भावना यावेळी व्यक्त केल्या.
या वेळी डाब येथे महासभा झाली असून प्रचंड संख्येने काँग्रेस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी सर्वाचा उत्साह विजयाची साक्ष देत होता.