Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ हिना गावीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारासाठी सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारात

नंदुरबार दि २ (प्रतिनिधी) नंदुरबार लोकसभा महायुती - भाजपाच्या उमेदवार खा. डॉ.हिना गावित यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी दहा मे २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नंदुरबार येथे पक्ष कार्यकर्ते यांना दिली.
        भाजपा तर्फे खा. डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.नंदुरबार लोकसभा क्षेत्रात खासदार डॉ. हिना गावित यांचे झंझावात दौरे सुरू आहेत. सात मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ.हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे सभा घेणार आहेत या सभेला एक लाखापेक्षा जास्त नागरिक-मतदार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
          भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज नंदुरबार येथे नमो संवाद बैठकीसाठीउपस्थित होते बैठकीनंतर यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीतील वाद लवकर संपुष्टात येऊन नंदुरबार लोकसभेत खासदार डॉक्टर हिना गावित या दोन लाख मतांनी विजयी होतील अस विश्वास व्यक्त केला.